'या' कलाकारांनी मालिकांमध्ये गाजवली कृष्णाची भूमिका

kimaya narayan

श्रीकृष्ण

आज 26 ऑगस्टला सगळीकडे जन्माष्टमी उत्साहात साजरी केली जातेय. कृष्णजन्म हा सगळ्यांसाठीच आनंदाचा दिवस. अगदी सिनेमा आणि मालिकांमध्येही कृष्णाशी संबंधित अनेक कथा पाहायला मिळाल्या. जाणून घेऊया कृष्णाची भूमिका गाजवणाऱ्या कलाकारांविषयी.

नितीश भारद्वाज

बी आर चोप्रा यांच्या गाजलेल्या महाभारत या मालिकेत नितीश भारद्वाज यांनी श्रीकृष्णाची भूमिका साकारली. त्यांनी साकारलेला कृष्ण अजरामर झाला.

मानधन

आजही अनेकजण नितीश यांना या भूमिकेसाठी ओळखतात. या भूमिकेसाठी त्यांना प्रत्येक एपिसोडमागे 3000 रुपये इतकं मानधन मिळायचं.

सर्वदमन बॅनर्जी

रामानंद सागर यांच्या गाजलेल्या श्रीकृष्ण या मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारली अभिनेता सर्वदमन बॅनर्जी यांनी. त्यांचा अभिनय, त्यांचे संवाद सगळ्यांनाच आवडले.

मानधन

या भूमिकेसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. तर त्यांचं मानधन होतं प्रत्येक एपिसोडमागे 10000 रुपये.

स्वप्नील जोशी

श्रीकृष्ण या मालिकेत तरुण वयातील श्रीकृष्णाची भूमिका साकारली अभिनेता स्वप्नील जोशीने. त्याने साकारलेला श्रीकृष्ण खूप गाजला. राधापर्व हा श्रीकृष्णाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग स्वप्नीलने पडद्यावर साकारला.

मानधन

या भूमिकेमुळे स्वप्नीलला सामान्य जनतेने देवत्वच बहाल केलं. त्यावेळी त्याचं वय खूप लहान होतं. हा कृष्ण साकारायला त्याला प्रत्येक एपिसोडमागे 8500 रुपये इतकं मानधन मिळायचं.

सौरभ राज जैन

2000 च्या पौराणिक मालिकांमध्ये कृष्णाची भूमिका साकारून गाजवली ती अभिनेता सौरभ राज जैन याने. आजही अनेकजण त्याला या भूमिकेमुळेच ओळखतात. सिद्धार्थ तिवारी दिग्दर्शित महाभारत या मालिकेसाठी त्याने ही भूमिका साकारली होती.

मानधन

या भूमिकेसाठी त्याला खूप पुरस्कार मिळाले. या भूमिकेसाठी सौरभला प्रत्येक एपिसोडमागे 2.50 लाख इतकं मानधन मिळायचं.

सुमेध मुदगलकर

स्टार भारत चॅनेलवरच्या राधाकृष्ण या गाजलेल्या मालिकेत तरुण कृष्णाची भूमिका साकारली सुमेध मुदगलकर याने. स्वप्नील नंतर त्याने साकारलेला कृष्ण सुपरहिट झाला.

मानधन

या भूमिकेसाठी त्याचं खूप कौतुक झालं. प्रत्येक एपिसोड मागे त्याला 65000 रुपये इतकं मानधन मिळायचं. त्याची ही मालिका खूप चालली.

भुताला घाबरून शानने गायलं गाणं - येथे क्लिक करा