त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी सफरचंदाची घ्या मदत, बनवा 'हे' फेसपॅक्स

Monika Lonkar –Kumbhar

स्किनकेअर

आरोग्यासोबतच त्वचेसाठी देखील सफरचंद फायदेशीर आहे.

apple face packs

सफरचंद

सफरचंदामध्ये भरपूर प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. रोज सफरचंद खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.

apple face packs

सफरचंद आणि दही

सफरचंदापासून तुम्ही फेसपॅक बनवू शकता. दही आणि सफरचंदाचा हा फेस पॅक बनवण्यासाठी सफरचंदाची मिक्सरला पेस्ट करून घ्या. आता या, पेस्टमध्ये २ चमचे दही मिसळा. त्यासोबत १ चमचा लिंबाचा रस मिक्स करा.

apple face packs

चेहरा होईल स्वच्छ

हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्र करून चेहऱ्यावर लावा. १५-२० मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवा.

apple face packs

सफरचंद आणि मध

सफरचंद आणि मधाचा हा फेस पॅक त्वचेवर लावल्याने त्वचा छान चमकते. हा फेस पॅक बनवण्यासाठी सफरचंदाची मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्या. आता, या पेस्टमध्ये १ चमचा मध आणि १ चमचा हळद मिसळा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यात गुलाबजल मिसळू शकता.

apple face packs

चेहऱ्यावर येईल ग्लो

आता हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्र करा आणि चेहऱ्यावर लावा. १५-२० मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येईल.

apple face packs

गुलाबजल आणि सफरचंद

त्वचा कोरडी असेल तर सफरचंदाच्या पेस्टमध्ये १ चमचा गुलाबजल, १ चमचा ग्लिसरीन मिसळा. आता हे मिश्रण मिक्स करून चेहऱ्यावर लावा. १५-२० मिनिटांनी चेहरा धुवून टाका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

apple face packs