काळ्या तीळाचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Monika Lonkar –Kumbhar

काळे आणि पांढरे तीळ

पोषकतत्वांनी परिपूर्ण असलेले काळे आणि पांढरे तीळ आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. या तीळांपासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात. 

Black Sesame Benefits

काळे तीळ

काळ्या तीळामध्ये कॅल्शिअम, फायबर्स, लोह, फॉस्फरस यांसारखे अनेक पोषकघटक आढळतात, जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात.

Black Sesame Benefits

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते

काळ्या तीळामध्ये पोषकतत्वांचे भरपूर प्रमाण आढळून येते. ही पोषकतत्वे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास मदत करतात.

Black Sesame Benefits

यकृत राहते निरोगी

काळ्या तीळापासून अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात. तीळाचा आहारात समावेश केल्याने आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते. यासोबतच यकृत देखील निरोगी राहते. 

Black Sesame Benefits

परंतु, तुमच्या दैनंदिन आहारात मर्यादित प्रमाणातच काळ्या तीळाचा समावेश करणे, फायद्याचे ठरते.

Black Sesame Benefits

पचनाशी निगडीत समस्या करते दूर

काळ्या तीळामध्ये फायबर्सचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे, जेव्हा आपण काळ्या तीळाचा आहारात समावेश करतो, तेव्हा त्याचा आपल्या पचनक्षमतेला फायदा होतो. कारण, यामुळे शरीरातील आतड्यांची प्रक्रिया तर सुलभ होतेच, शिवाय, पोटाच्या किंवा पचनाच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

Black Sesame Benefits

हृदयासाठी फायदेशीर

काळे तीळ हे हृदयासाठी अतिशय फायदेशीर आहेत. काळ्या तीळामधील पोषकतत्वे आपल्या शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे, हृदयाचे आरोग्य निरोगी राहू शकते.

Black Sesame Benefits

आरोग्यासाठी फायदेशीर आहे पुदिन्याचा चहा, जाणून घ्या फायदे

benefits of mint tea | esakal
येथे क्लिक करा.