Aishwarya Musale
रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे आहेत.
कोमट पाणी प्यायल्याने वजन तर कमी होतेच पण शरीरातील घाणही निघून जाते.
रात्रीच्या जेवणानंतर अर्धा तास किंवा झोपण्यापूर्वी एक किंवा दोन तास आधी कोमट पाणी प्या. यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते.
कोमट पाणी प्यायल्याने शरीर दिवसभर सक्रिय राहते. तसेच कोमट पाण्यात लिंबाचे 2 थेंब टाकल्यास शरीराला ऊर्जा मिळते.
जर तुम्हाला पोट किंवा पचनाशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर दररोज झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्या.
पोटाशी संबंधित अनेक आजार जसे की बद्धकोष्ठता, अपचन आणि गॅसशी संबंधित समस्या दूर होतील.
रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्या, यामुळे तणाव आणि नैराश्य कमी होते.
गरम पाणी प्यायल्याने मेंदू सक्रिय राहतो. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यायल्याने झोप चांगली लागते.