सकाळ डिजिटल टीम
कोरफड ही औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते. कोरफडीमध्ये कॅल्शिअम ,मॅग्नेशियम , झिंक, लोह हे भरपूर प्रमाणात असतात. म्हणून कोरफड ही आयुर्वेदीक मानली जाते.
अनेक औषधी वनस्पतीपैकी एक म्हणजे कोरफड आहे.
कोरफडमुळे अनेक प्रकारचे त्वचा रोग बरे होतात.
झोप न झाल्याने डोळे चुरचुरत असतील, तर गार पाण्यात कोरफडीचा रस घालून त्याने डोळे धुतल्यास आराम मिळतो. डोळे आले असतील तर कोरफडीचा रस डोळ्यांना लावल्याने डोळ्यांना आराम मिळतो.
कोरफड ही केसांसाठी उपयुक्त ठरते, कोरफडीमुळे केस दाट आणि मजबूत होतात त्याच बरोबर केस गळती ही थांबते.
कोरफडीच्या रसामुळे पचनशक्ती सुधारते,असिडिटी कमी होते, मूळव्याध कमी करते अशा सगळ्या आजारावर कोरफड उपयोगी ठरते.
घरगुती उपाय म्हणून सर्दी आणि खोकल्यावर कोरफडीचा रस देखील उपयोगी ठरतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.