हिवाळ्यातील सुपरफूड आहे बाजरी, जाणून घ्या 'हे' आरोग्यदायी फायदे

Monika Lonkar –Kumbhar

बाजरी

बाजरी ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानली जाते. पोषकतत्वांनी युक्त असलेल्या बाजरीचा आहारात समावेश असणे फायद्याचे आहे. 

benefits of bajra

हिवाळा

बाजरीमध्ये फायबर, प्रथिने आणि जीवनसत्वांचे भरपूर प्रमाण आढळून येते. खास करून हिवाळ्यात बाजरीचे अधिक प्रमाणात सेवन केले जाते.

benefits of bajra

बाजरीची भाकरी

बाजरी हे धान्य उष्ण आहे, त्यामुळे, हिवाळ्यात या बाजरीच्या भाकरीचे सेवन करण्यावर लोकांचा भर असतो. हिवाळ्यात आपल्या शरीराला ऊब मिळणे आवश्यक असते. त्यामुळे, बाजरीचे सेवन केले जाते.

benefits of bajra

मधुमेहींसाठी लाभदायी

बाजरीचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी आहे. त्यामुळे, बाजरीचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. मधुमेहाच्या रूग्णांसाठी बाजरीचे सेवन करणे हे अतिशय लाभदायी आहे. 

benefits of bajra

अशा परिस्थितीमध्ये मधुमेहाच्या रूग्णांनी त्यांच्या आहारात बाजरीच्या भाकरीचा जरूर समावेश करावा.

benefits of bajra

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

बाजरीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने आणि इतर पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. हे पोषकघटक आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतात. 

benefits of bajra

पचनक्षमता सुधारते

बाजरीमध्ये मोठ्या प्रमाणात डायटरी फायबर आढळून येते. हे डायटरी फायबर आपली पचनशक्ती मजबूत करण्यास मदत करते. ज्या लोकांना पोटाच्या समस्या आहेत, त्यांनी आहारात बाजरीच्या भाकरीचा  जरूर समावेश करावा.

benefits of bajra

हिवाळ्यात त्वचेसाठी लाभदायी आहे तिळाचे तेल, अशा पद्धतीने करा वापर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

skin care tips | esakal
येथे क्लिक करा.