Monika Lonkar –Kumbhar
आपल्या स्वयंपाकघरात अनेक प्रकारच्या मसाल्यांचा वापर केला जातो. या मसाल्यांमध्ये काळी मिरीचा ही समावेश आहे.
अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थांमध्ये काळी मिरीचा आवर्जून वापर केला जातो. यामुळे खाद्यपदार्थांना छान चव मिळते.
काळी मिरीमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आढळून येतात. काळी मिरीतील हे औषधी गुणधर्म आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.
काळी मिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. या पोषकघटकांमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहण्यास मदत होते.
विशेष म्हणजे ही काळी मिरी व्हिटॅमिन अ आणि व्हिटॅमिन क चा प्रमुख स्त्रोत आहे.
काळी मिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाइपरिन आणि अँटीओबेसिटीसाठी प्रभावी असणाऱ्या घटकांचा समावेश आढळून येतो. त्यामुळे, वजन कमी करण्यासाठी काळी मिरी अतिशय फायदेशीर ठरते.
काळी मिरी सांधेदुखी कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. काळी मिरीमध्ये अँटीइंफ्लेमेंटरी आणि संधिवात विरोधी प्रभावी घटक आढळून येतात. सांधेदुखीमुळे होणारी वेदना आणि सूज कमी करण्यासाठी काळी मिरी फायदेशीर ठरते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.