Monika Lonkar –Kumbhar
पोषकतत्वांनी समृद्ध असलेली आणि आरोग्यासाठी फायदेशीर असलेली ब्रोकोली सुपरफूड म्हणून ओळखली जाते.
ब्रोकोलीची चविष्ट भाजी करण्यासोबतच ब्रोकोलीचे सूप देखील केले जाते.
ब्रोकोलीचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे, मधुमेह असलेल्या रूग्णांनी त्यांच्या आहारात हिरव्या भाज्यांसोबत ब्रोकोलीचा ही समावेश करावा.
ब्रोकोलीमधील फायबरची गुणवत्ता रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी सामान्य ठेवण्याचे काम करतात. ज्यामुळे, हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
व्हिटॅमिन सी चा समृद्ध स्त्रोत म्हणून ब्रोकोलीला ओळखले जाते. व्हिटॅमिन सी मध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म आढळून येतात. हे गुणधर्म आपल्या शरीराला विविध प्रकारचे संसर्ग आणि रोगांशी लढण्यास मदत करतात
ब्रोकोलीतील व्हिटॅमीन सी आपल्या त्वचेतील कोलेजनचे उत्पादन वाढवण्यावर भर देते. त्यामुळे, ब्रोकोलीचे सेवन करणे हे त्वचेसाठी लाभदायी आहे.
ब्रोकोलीचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे, आहारात ब्रोकोलीचा जरूर समावेश करावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.