Monika Lonkar –Kumbhar
जगभरात कॉर्न या नावाने ओळखला जाणारा मका हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.
मक्यामध्ये प्रथिने, फायबर्स, फॅट्स आणि व्हिटॅमिन्सचे भरपूर प्रमाण आढळून येते, त्यामुळे, तर मक्याला सुपरफूड असे म्हटले जाते. मक्यापासून अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात.
मक्यामध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन ही दोन प्रकारची महत्वाची संयुगे मक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतात. ही दोन्ही संयुगे ज्याला कॅरोटीनोइड्स असे म्हटले जाते, ही कॅरोटीनोइड्स आपल्या डोळ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि फायदेशीर आहेत.
मक्यामध्ये पोषकघटकांचे भरपूर प्रमाण आढळून येते. शिवाय, ‘व्हिटॅमीन सी’ चा प्रमुख स्त्रोत म्हणून ही मक्याला ओळखले जाते. त्यामुळे, हिवाळ्यात मक्याचे अवश्य सेवन करा. यामुळे, रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
मक्यातील पोषक घटक आपल्या शरीराला निरोगी ठेवण्याचे काम करतात. त्यासोबतच, मक्याचे सेवन करणे हे आपली त्वचा आणि केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे.
मका हे आपल्या पचनसंस्थेसाठी अतिशय उत्तम आहे. मक्याचे सेवन केल्याने आपली पचनक्षमता सुधारण्यास मदत होते. शिवाय, पोटाच्या विविध समस्यांपासून देखील आराम मिळतो. त्यामुळे, मक्याचे अवश्य सेवन करा.
‘व्हिटॅमीन सी’ चा प्रमुख स्त्रोत म्हणून ही मक्याला ओळखले जाते. व्हिटॅमीन सी चा योग्य पुरवठा आपल्या शरीराला झाल्यावर हे व्हिटॅमीन सी संसर्गांशी लढण्यास मदत करते आणि फुफ्फुसांना देखील बरे करते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.