हिवाळ्यात हॉट चॉकलेट खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

Monika Lonkar –Kumbhar

हिवाळा

हिवाळा सुरू झाला की आपण आरोग्याची खास काळजी घेतो. वातावरणातील थंडावा दूर करण्यासाठी आणि शरीराला उष्णता मिळावी यासाठी, आपण अनेक प्रयत्न करतो. 

Hot Chocolate Benefits

या दिवसांमध्ये अनेक जण सकाळच्या कोवळ्या ऊन्हात बसून शरीराला ऊब देण्याचा प्रयत्न करताना दिसतात, तर काही जण आहारात उष्ण पदार्थांचा समावेश करतात, जेणेकरून शरीराला उष्णता मिळावी.

Hot Chocolate Benefits

हॉट चॉकलेट

हॉट चॉकलेट तुम्हाला फक्त आतून गरम ठेवत नाही, तर तुमच्या शरीराला ते अनेक दृष्टींनी फायदेशीर आहे.

Hot Chocolate Benefits

पोषकघटकांनी परिपूर्ण

उत्तम प्रतीच्या कोको आणि दूधाने जेव्हा हॉट चॉकलेट बनवले जाते, तेव्हा ते पोषकघटकांनी परिपूर्ण आणि समृद्ध असते. 

Hot Chocolate Benefits

हृदयासाठी फायदेशीर

फ्लेव्होनॉईड्सने युक्त असलेले हे हॉट चॉकलेटमधील पोषकघटक आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. 

Hot Chocolate Benefits

मूड सुधारण्याचे काम करते

हिवाळ्यात हॉट चॉकलेटचे सेवन केल्यास आपला मूड सुधारतो. जेव्हा आपण हॉट चॉकलेटचे सेवन करतो, त्यावेळी एंडॉर्फिन या फिल-गुड हार्मोनचे उत्पादन उत्तेजित होऊ शकते. ज्यामुळे, आपला मूड सुधारण्यास मदत होते.

Hot Chocolate Benefits

हाडांना मिळते बळकटी

दूधापासून बनवण्यात आलेल्या हॉट चॉकलेटमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण भरपूर असते. या कॅल्शिअममुळे आपल्या शरीराची हाडे मजबूत आणि निरोगी राहण्यास मदत होते. हॉट चॉकलेटचे सेवन केल्याने हाडांना बळकटी देखील मिळते. 

Hot Chocolate Benefits

हिवाळ्यात तुमचे ही केस खूप गळतात? मग, या घरगुती उपायांची घ्या मदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

hair care tips
येथे क्लिक करा.