Monika Lonkar –Kumbhar
अनेक महिलांना वाटते की, आपला चेहरा सुंदर दिसावा. चेहऱ्यावरील समस्या कमी होऊन चेहरा चमकदार दिसावा.
चेहरा सुंदर आणि ग्लोईंग दिसावा यासाठी महिला अनेक उपाय करतात. काही जणी ब्युटी पार्लरमध्ये जाऊन चेहऱ्याचे ब्लीच करतात. चेहऱ्यावर ब्लीच केल्याने होणारे फायदे जाणून घेऊयात.
उन्हामुळे आपली त्वचा टॅन होते. त्यामुळे, हे टॅनिंग घालवण्यासाठी ब्लीच करणे फायदेशीर ठरू शकते.
जर तुमचा चेहरा निस्तेज दिसत असेल तर, चेहऱ्यावर ब्लीच केल्याने त्वचा चमकदार दिसण्यास मदत होते. तुमच्या त्वचेला सूट होणाऱ्या ब्लीचचा वापर तुम्ही करू शकता.
अनेक महिलांच्या चेहऱ्यावर पिंपल्सचे डाग किंवा इतर काळे डाग असतात. हे डाग हटवण्यासाठी ब्लीच तुमची मदत करते.
अनेक महिलांच्या चेहऱ्यावर बारीक केस असतात, त्याला चेहऱ्यावरील लव असे ही म्हणतात. हे बारीक केस लपवण्यासाठी ब्लीचची मदत घेऊ शकता. ब्लीच केल्याने चेहऱ्यावरील बारीक केस सोनेरी होऊन ते लपले जातात.
चेहऱ्यावर ब्लीच केल्याने डोळ्यांखालील ब्लॅक सर्कल्सचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.