Monika Lonkar –Kumbhar
भारतीय लोकांच्या जेवणातील प्रमुख पदार्थांमध्ये विविध प्रकारच्या डाळींचा आणि कडधान्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आढळून येतो. या डाळींचा आणि कडधान्यांचा आपल्या आहारात समावेश केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.
हिरवे मूग पोषकघटकांनी परिपूर्ण आहेत. हिवाळ्यात या हिरव्या मुगाचे सेवन केल्याने आपल्या पोटाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
हिरव्या मुगापासून अनेक प्रकारचे चविष्ट पदार्थ देखील बनवले जातात. या पदार्थांचा आहारात समावेश केल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात.
मूळात हिरव्या मूगाचा ग्लायसेमिक इंडेक्स हा खूप कमी असतो, त्यामुळे, मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी हिरव्या मूगाचा आहारात समावेश करणे हे फायदेशीर ठरते.
या हिरव्या मूगामध्ये आढळून येणाऱ्या कार्बोहायड्रेट्समुळे आपले अन्न सुरळीतपणे पचते. त्यामुळे, रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही. परिणामी ज्या लोकांना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायची आहे, अशा व्यक्तींनी त्यांच्या आहारात हिरव्या मूगाचा जरूर समावेश करावा.
हिरव्या मुगामध्ये प्रथिने, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचा भरपूर समावेश आढळून येतो. प्रथिनांचा उत्तम स्त्रोत म्हणून ही हिरव्या मुगाला प्रामुख्याने ओळखले जाते. वनस्पती आधारित असलेले हे हिरवे मूग आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.
हिरव्या मूगामध्ये फायबर्स आणि अँटिऑक्सिडंट्सचा भरपूर समावेश आढळून येतो. या पोषकघटकांमुळे कॉलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. ज्यामुळे, हृदयविकाराचा धोका कमी होतो. शिवाय, रक्तदाब देखील सुरळीत राहतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.