Monika Lonkar –Kumbhar
केसांची योग्य प्रकारे काळजी घेण्यासाठी आपण अनेक गोष्टी करतो. ज्यामध्ये हेअर स्पा, हेअर मास्क, हेअर ब्लो ड्राय आणि केसांना नियमित शॅंम्पू आणि कंडिशनिंग अशा अनेक गोष्टी करतो.
परंतु, तुम्हाला हे माहित आहे का? की, नियमितपणे केस ट्रिम करणे किंवा केस कट करणे हे देखील केसांसाठी फायदेशीर आहे. केस नियमितपणे ट्रिम केल्याने केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
केसांना फाटे फुटले की केस खराब होण्याचे प्रमाण वाढते. केसांना फाटे फुटल्यामुळे केसांचा अधिक गुंता होण्यास सुरूवात होते. अशा स्थितीमध्ये केस ट्रिम केल्याने केस चांगल्या प्रकारे वाढण्यास मदत होते. केस ट्रिम केल्याने केस तुटण्याचे प्रमाण काही अंशी कमी होते.
केस नियमितपणे ट्रिम केल्याने किंवा केस कापल्याने केसांचे आरोग्य चांगले राहते. केसांना फुटलेले फाटे आणि खराब केसांची समस्या दूर करण्यासाठी केस अवश्य ट्रिम करावेत किंवा कापावेत. केस ट्रिम केल्याने केसांना छान लूक देखील मिळतो आणि केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
केस नियमितपणे ट्रिम केल्याने किंवा केस कट केल्याने केसांचा पोत सुधारण्यास मदत होते.
जर तुम्हाला तुमच्या केसांची स्टाईल बदलायला आवडत असेल तर तुम्ही केसांचे ट्रिमिंग किंवा केस कापायला हवेत. यामुळे, केसांची स्टाईल ही होते आणि केसांची चांगल्या प्रकारे देखभाल करणे देखील सोपे जाते.
केसांची वेगवेगळ्या प्रकारे स्टाईल केल्याने तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल होतो. शिवाय, केस ट्रिम केल्याने तुम्हाला एक सुंदर लूक मिळण्यास मदत होते.