Monika Lonkar –Kumbhar
निरोगी जीवनशैलीसाठी तुम्ही संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. जर तुम्ही या दोन्ही गोष्टींची योग्य प्रकारे सांगड घातली तर आरोग्याच्या समस्या निर्माण होणार नाहीत.
मात्र, आजकाल वयाची चाळीशी जरी ओलांडली तरी शरीराला थकवा येण्यास सुरूवात होते. हाडे कमजोर होऊ लागतात.
किवीचे सेवन केल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात. हिवाळ्यात तर हे फळ खाणे आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे.
किवीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअमचा समावेश आढळून येतो. एक कप किवीमध्ये साधारणपणे ६१.२ मिलीग्रॅम कॅल्शिअमचे प्रमाण आढळून येते. त्यामुळे, किवीचे सेवन केल्याने आपल्या शरीराला भरपूर ऊर्जा तर मिळते शिवाय, हाडांना बळकटी मिळण्यास मदत होते.
किवीमध्ये कॅल्शिअमसोबतच इतर पोषकघटकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आढळून येतो. या पोषकघटकांमुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते.
थंडीच्या दिवसांमध्ये संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे, आपण सर्दी-खोकल्यासारख्या आजारांना लगेच बळी पडतो. या आजारांपासून दूर राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही आहारात किवीचा जरूर समावेश करावा.
किवीमध्ये कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअमसोबतच फायबर्सचे भरपूर प्रमाण आढळून येते. या फायबर्समुळे शरीर तंदूरूस्त राहण्यास मदत होते. या फायबर्समुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. तसेच, आपल्या शरीराची पचनक्षमता सुधारण्यास किवी लाभदायी ठरते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.