हिवाळ्यात तंदूरूस्त राहण्यासाठी फायदेशीर आहे लव्हेंडर टी

Monika Lonkar –Kumbhar

हिवाळा

मागील काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात थंडी वाढली आहे. या कडाक्याच्या थंडीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.

lavender tea

थंडी सुरू झाली की, अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होतो. खास करून सर्दी, ताप-खोकला इत्यादी समस्यांची त्यात आणखी भर पडते.

lavender tea

लव्हेंडर टी

हिवाळ्यात हा लव्हेंडर चहा प्यायल्याने आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासोबत अनेक प्रकारचे फायदे आपल्याला होतात. 

lavender tea

चांगली झोप येते

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांच्या झोपेचे वेळापत्रक जणून कोलमडले आहे. अपुरी झोप झाली की, आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे, चांगल्या झोपेसाठी तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी लव्हेंडर चहा बनवून प्यायला तर तुम्हाला चांगली झोप येईल. 

lavender tea

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

लव्हेंडर चहा प्यायल्याने आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यासोबतच हा चहा प्यायल्याने आपले शरीर फ्रेश आणि तंदूरूस्त राहण्यास मदत होते. त्यामुळे, हिवाळ्यात तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हा चहा नक्की बनवा आणि प्या.

lavender tea

फ्लूपासून बचाव होतो

हिवाळ्यात सर्दी-ताप आणि खोकल्यापासून बचाव करण्यासाठी लव्हेंडर टी हा अतिशय फायदेशीर आहे. हा चहा जादूप्रमाणे काम करतो आणि या आजारांपासून आपली सुटका करण्यास मदत करतो.

lavender tea

बॉडी डिटॉक्ससाठी लाभदायी

आपले शरीर डिटॉक्स करण्यासाठी हा लव्हेंडर टी उपयुक्त आहे. या दिवसांमध्ये हा चहा नियमितपणे प्यायल्याने आपल्या शरीराची पचनक्षमता देखील सुरळीत राहते आणि शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.

lavender tea

रेट्रो वॉकिंग म्हणजे काय? जाणून घ्या 'हे' आरोग्यदायी फायदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

retro walking
येथे क्लिक करा.