Monika Lonkar –Kumbhar
निरोगी जीवनशैलीसाठी नियमितपणे व्यायाम आणि संतुलित आहार घेणे महत्वाचे आहे.
निरोगी आरोग्यासाठी जिम, योगा, व्यायाम, मेडिटेशन आणि आयुर्वेदाची देखील मदत घेतली जाते.
खाद्यपदार्थ बनवण्यासाठी ऑलिव्ह ऑईलचा वापर केल्यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. पोट जड होणे, पोटात गॅस होणे, बद्धकोष्ठता इत्यादी पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल फायदेशीर आहे.
सर्व शारिरीक समस्यांचे किंवा आजारांचे मूळ हे तणावात आहे. जर तुम्ही जास्त स्ट्रेस घेतला तर त्याचा आरोग्यावर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे, या परिस्थितीमध्ये ऑलिव्ह ऑईल उपयुक्त ठरते.ऑलिव्ह ऑईल तुम्हाला नैराश्यापासून दूर ठेवते.
ज्या लोकांना मधुमेह आहे आणि हृदयाशी निगडीत समस्या आहेत, अशा लोकांसाठी ऑलिव्ह ऑईल हे अतिशय रामबाण आहे.
हृदयाशी निगडीत समस्यांचा आणि मधुमेहाचा जवळचा संबंध असल्याचे अनेक संशोधनांमधून समोर आले आहे.त्यामुळे, ज्या लोकांना मधुमेह आहे, अशा लोकांनी ऑलिव्ह ऑईलचा नक्की वापर करावा. यामुळे, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होईल.
ऑलिव्ह ऑईल हे आरोग्यासोबत त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. या तेलाने रात्री झोपताना चेहऱ्यावर मसाज केल्याने त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.