त्वचेसाठी लाभदायी आहे सूर्यफूल, जाणून घ्या 'हे' आश्चर्यकारक फायदे

Monika Lonkar –Kumbhar

सूर्यफूल

सूर्यफूल हे केवळ दिसायलाच सुंदर नसते तर ते आपल्या शरीरासाठी देखील फायदेशीर आहे. सूर्यफूल ही वनस्पती आपले अनेक आजारांपासून संरक्षण करते. 

Sunflower Oil for Skin

सूर्यफूलाचे तेल

या वनस्पतीपासून तेल बनवले जाते, या तेलाचा वापर स्वयंपाकघरात देखील केला जातो.

Sunflower Oil for Skin

त्वचेसाठी फायदेशीर

सूर्यफूलाचे तेल हे आपल्या त्वचेसाठी देखील अतिशय फायदेशीर आहे. ज्यांची त्वचा संवेदनशील आहे, त्यांच्यासाठी तर हे तेल अतिशय लाभदायी आहे. हिवाळ्यात या तेलाचा आवर्जून वापर केला जातो. 

Sunflower Oil for Skin

मृत त्वचा काढून टाकते

त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यासाठी तुम्ही सूर्यफूलाच्या तेलाचा वापर करू शकता. या तेलाचा वापर केल्याने मृत त्वचा निघून जाते.

Sunflower Oil for Skin

त्वचेला ठेवते हायड्रेटेड

सूर्यफूलाचे तेल हे नैसर्गिक तेल आहे, जे एक इमोलियंट मानले जाते. त्यामुळे, हे तेल त्वचेला हायड्रेट ठेवण्याचे काम करते. या तेलाचा वापर त्वचेवर केल्याने कोरड्या त्वचेची समस्या तर दूर होते शिवाय त्वचा हायड्रेटेड राहण्यास मदत होते.

Sunflower Oil for Skin

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करते

सूर्यफूलाच्या तेलात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्सचा समावेश आढळून येतो. या तेलाचा वापर केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होण्यास मदत होते.

Sunflower Oil for Skin

कोरड्या त्वचेपासून बचाव करते

थंडीमुळे त्वचा अधिक कोरडी पडण्याचा धोका असतो. त्यामुळे, कोरड्या त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी सूर्यफूलाचा तेलाचा अवश्य वापर करा. या तेलाचा त्वचेवर वापर केल्याने कोरड्या त्वचेच्या समस्या दूर होतात आणि त्वचा हायड्रेटेड राहते.

Sunflower Oil for Skin

चेहऱ्यावर हवा आहे ग्लो, मग, सफरचंदापासून बनवा 'हे' फेसपॅक्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

apple face packs | esakal
येथे क्लिक करा.