Monika Lonkar –Kumbhar
अक्रोडमध्ये जीवनसत्वे, खनिजे, प्रथिने आणि फायबर्सचे भरपूर प्रमाण आढळून येते.
अक्रोडचे सेवन करणे हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. हिवाळ्यात अक्रोडचे सेवन केल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात.
अक्रोडचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे, मधुमेह आणि टाईप २ मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी हिवाळ्यात आवर्जून अक्रोडचे सेवन करावे.
अक्रोडमध्ये आढळून येणाऱ्या अल्फा-लिनोलेनिक अॅसिडमुळे आपल्या शरीरातील कमकुवत हाडांना बळकटी मिळण्यास मदत होते. जर तुम्हाला हाडांशी संबंधित समस्या असतील आणि मांसपेशींमध्ये वेदना होत असतील तर तुम्ही रोज अक्रोडचे सेवन करण्यास सुरूवात करा.
हिवाळ्यात अक्रोडचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. अक्रोडमध्ये प्रथिने, फायबर्स, फॅट्स आणि जीवनसत्वांचे मुबलक प्रमाण आढळून येते. ज्यामुळे, अक्रोडचे सेवन केल्यानंतर भूक कमी लागते आणि पोट भरलेले राहते.
अक्रोडचे नियमितपणे सेवन केल्याने मेंदू तीक्ष्ण होतो. त्यामुळे, आपल्या बुद्धीसाठी अक्रोड खाणे हे अतिशय फायदेशीर आहे.
अक्रोडचे सेवन केल्याने त्वचा मॉईश्चराईझ राहते आणि त्वचा कोरडी होण्यापासून वाचते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.