सकाळ डिजिटल टीम
तुम्ही अनेक महिन्यांपासून वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहात; पण तुमचे वजन कमी होत नाहीये.
तुम्ही रोज व्यायाम करत असाल आणि हेल्दी डाएट फॉलो करत असाल, पण तुम्हाला वजन कमी करण्यात अडचण येत असेल, तर तुम्हाला इतर काही गोष्टींकडे लक्ष द्यावे लागले.
मेथीच्या दाण्यांमध्ये चयापचय वाढवणारे घटक असतात. तसेच लठ्ठपणा कमी करून पचनशक्ती वाढवण्यास मदत होते. मेथीचे पाणी प्यायल्याने वजन लवकर कमी होते.
सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने वजन झपाट्याने कमी होते. लिंबू पाणी शरीराला हायड्रेट तर ठेवतेच, पण ते प्यायल्याने ऊर्जाही मिळते. लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन सी शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते.
बीटरूट एक अशी भाजी आहे, जी केवळ वजन कमी करण्यास मदत करत नाही तर तुम्हाला शक्ती देखील देते. बीटरूटमध्ये आहारातील फायबर, अँटी-ऑक्सिडंट्स आणि अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे आढळतात, ज्यामुळे तुमची चयापचय वाढते आणि वजन कमी होते.
वजन कमी करण्यासाठी तुम्ही अनेकांना ग्रीन टी पिताना पाहिलं असेल. ग्रीन टी प्यायल्याने तुमची चयापचय क्रिया वाढते आणि शरीरातील जळजळही कमी होते.