Monika Lonkar –Kumbhar
दक्षिण भारत हा आपल्या देशातील असाच एक विलोभनीय भाग आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य जगभरात प्रसिद्ध आहे.
दक्षिण भारत जसा तेथील समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. तसाच, तो तेथील काही प्रेक्षणीय आणि आकर्षक हिल स्टेशन्ससाठी प्रसिद्ध आहे.
केरळमधील सुप्रसिद्ध ठिकाण म्हणून वागामो प्रसिद्ध आहे. हे हिलस्टेशन समुद्रसपाटीपासून १ हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवर वसलेले आहे. हे अतिशय मनमोहक आणि नयनरम्य हिलस्टेशन आहे.
या परिसरातील उंच पर्वत, घनदाट जंगले, तलाव आणि धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. त्यामुळे, देश-विदेशातील अनेक पर्यटकांची येथे मांदियाळी पहायला मिळते. निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण नंदनवन आहे.
जर तुम्हाला नवीन वर्षाचे स्वागत काही वेगळ्या अंदाजात करायचे असेल तर वायनाड हे हिलस्टेशन तुमच्यासाठी बेस्ट आहे.
वायनाडमध्ये नवीन वर्षाचे स्वागत करण्यासोबतच तुम्ही येथील चेंबरा पीक, वायनाड वन्यजीव अभयारण्य, कुरूव बेट, पूकोट तलाव आणि बाणासूर हिल्स यांसारखी अद्भूत आणि प्रसिद्ध ठिकाणे देखील तुम्ही एक्सप्लोअर करू शकता.
कूर्ग हे कर्नाटक राज्यातील सर्वात प्रसिद्ध असे ठिकाण आहे. येथील नयनरम्य परिसर हे पर्यटकांचे खास आकर्षण आहे. जगभरातील अनेक पर्यटक या हिलस्टेशनला भेट देण्यासाठी दरवर्षी गर्दी करत असतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.