Monika Lonkar –Kumbhar
लक्षद्वीप हा भारताचा अतिशय सुंदर आणि नयनरम्य केंद्रशासित प्रदेश आहे. या प्रदेशाचे सौंदर्य अनेक पर्यटकांना भुरळ घालते. त्यामुळे, येथे देश-विदेशातील पर्यटकांची नेहमीच गर्दी असते.
लक्षद्वीपमधील सुंदर बेटे ही फिरण्यासाठी बेस्ट आहेत. तुम्ही जर या थंडीत फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर लक्षद्वीपचा विचार करायला काही हरकत नाही.
लक्षद्वीपमधील सुंदर बेटांचा विचार करायचे झाल्यास या मिनिकॉय द्वीपचा उल्लेख सर्वात आधी करावा लागेल.
मिनिकॉय येथील सीफूड अतिशय प्रसिद्ध आहे. जर तुम्ही सीफूडचे शौकिन असाल तर तुम्हाला येथे खाण्यामध्ये विविध प्रकारच्या डिशेस उपलब्ध मिळतील.
हे द्वीप हिंदी महासागराच्या स्वच्छ आणि निळ्याशार पाण्यात वसलेले असून हे बेट भारतीय आणि विदेशी पर्यटकांमध्ये अतिशय प्रसिदध मानले जाते.
बंगाराम द्वीपवर तुम्ही स्कूबा-डायविंग, स्नॉर्कलिंग, कयाकिंग, खोल समुद्रातील मासेमारी आणि विंडसर्फिंग वॉटर स्पोर्टसचा ही आनंद घेऊ शकता. या बेटावरून नयनरम्य सूर्यास्त आणि सूर्योदय पाहणे ही पर्यटकांसाठी मोठी पर्वणी असते.
लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी म्हणून कवरत्ती द्वीपची खास ओळख आहे. या द्वीपवरील निळेशार पाणी, पांढरी वाळू आणि नयनरम्य नजारे हे पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.