Monika Lonkar –Kumbhar
गुजरात या राज्यातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि प्रमुख शहर म्हणून द्वारका या शहराची खास ओळख आहे. हे शहर भगवान श्रीकृष्ण यांना समर्पित आहे.
भारतातील प्रमुख चारधामपैकी द्वारका हे एक प्रमुख धाम मानले जाते.
अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले हे शहर तेथील पवित्र मंदिरे, समुद्रकिनारे आणि मनमोहक पर्यटनस्थळांसाठी लोकप्रिय आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच द्वारकेला भेट दिली होती.
यावेळी मोदी द्वारकेजवळ स्थित असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर स्कूबा डायव्हिंग करताना दिसले होते. या संदर्भातील फोटो आणि व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर, द्वारका हे शहर चांगलेच चर्चेत आले होते.
द्वारका या शहरापासून जवळपास ३० किलोमीटरच्या अंतरावर स्थित असलेला हा सुंदर समुद्रकिनारा पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. द्वारका या शहाराच्या नावावरूनच या समुद्रकिनाऱ्याला हे नाव देण्यात आले.
द्वारका या शहराजवळ स्थित असलेले हे मांडवी कच्छ बीच या परिसरातील सर्वात लोकप्रिय बीच आहे. असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. मांडवी कच्छ समुद्रकिनाऱ्याला ऐतिहासिक महत्व आहे. कारण, मध्ययुगीन काळामध्ये एक शिपिंग पोर्ट म्हणून या समुद्रकिनाऱ्याला ओळखले जात होते.
द्वारकेला गेल्यावर या बीचला भेट द्यायला अजिबात विसरू नका. द्वारका या शहरापासून ११ किमी अंतरावर असलेल्या शिवराजपूर या समुद्रकिनाऱ्याला त्याच्या सौंदर्यासाठी आणि तेथील स्वच्छतेसाठी ‘ब्लू फ्लॅग बीच’ असा दर्जा मिळाला आहे.