Monika Lonkar –Kumbhar
अयोध्येमध्ये मागील काही दिवसांपासून प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापणेची जय्यत तयारी सुरू आहे. अयोध्येमध्ये २२ जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची नवीन मंदिरात प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे.
रामलल्लाच्या ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. त्या मूर्तीचे संपूर्ण छायाचित्र नुकतेच समोर आले आहे.
अयोध्या नगरी ही केवळ राम मंदिरासाठी प्रसिद्ध नाही तर येथील खाद्यपदार्थांसाठी देखील प्रसिद्ध आहे. एकदा जर तुम्ही येथील खाद्यपदार्थांची चव चाखली तर ही चव तुम्ही कधीच विसरणार नाही. मग, ते चाट असो किंवा जिलेबी.
दाल कचोरी आणि पूरी हा अयोध्येतील लोकांचा सकाळचा आवडता नाश्ता आहे. या दाल कचोरीमध्ये विविध प्रकारच्या भाज्या आणि कडधान्यांचा समावेश असतो. अयोध्येमध्ये मूग आणि उडीद डाळ यांच्यापासून बनवलेली कचोरी खूप प्रसिद्ध आहे. ही कचोरी चटणी किंवा भाजीसोबत खाल्ली जाते.
अयोध्येतील चाटची देखील खासियत आहे. ही खासियत म्हणजे अयोध्येमध्ये मिळणाऱ्या चाटसोबत गोड-आंबट चटणी, मसालेदार चणे, कोथिंबीर आणि इतर मसाल्यांचा वापर केला जातो. यामुळे, चाटची चव देखील वाढते.
ज्या लोकांना गोड खायला आवडते. त्यांच्यासाठी अयोध्येमध्ये गोड पदार्थांचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. अयोध्येतील स्पेशल रबडी सुप्रसिद्ध असून या रबडीमध्ये विविध प्रकारच्या ड्रायफ्रूट्सचा आणि केशरचा वापर केला जातो. त्यामुळे, या रबडीची चव खास असते. अयोध्येत गेल्यावर ही रबडी चाखायला विसरू नका.
अयोध्येत गेल्यावर येथील दही भल्ले खायला अजिबात विसरू नका. या दही भल्ल्यांची चव इतकी अप्रतिम आहे की, तुम्ही या दही भल्ल्यांची चव विसरूच शकणार नाही. हे दही भल्ले डाळींपासून बनवले जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.