आरोग्यासाठी बहुगुणी आहे च्यवनप्राश, जाणून घ्या ‘हे’ फायदे

Monika Lonkar –Kumbhar

च्यवनप्राश

च्यवनप्राश हे एक आयुर्वेदिक औषध आहे. च्यवनप्राशला आपण ‘आरोग्यवर्धक टॉनिक’ असे ही म्हणू शकतो. च्यवनप्राशमध्ये अनेक औषधी वनस्पती आणि पोषक घटकांचा समावेश असतो. 

Benefits Of Chyavanprash

निरोगी आरोग्य

निरोगी आरोग्यासाठी रोज एक चमचा च्यवनप्राश खाण्याचा सल्ला दिला जातो. प्राचीन काळापासून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी च्यवनप्राशचे सेवन केले जाते. हे संपूर्णपणे नैसर्गिक आहे.

Benefits Of Chyavanprash

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

च्यवनप्राशचे रोज १ चमचा सेवन केल्याने आपल्या शरीराला आवश्यक असलेले पोषकघटक यातून मिळतात, आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते.

Benefits Of Chyavanprash

एकाग्रता वाढते

लहान मुले असो की मोठी माणसे सर्वांसाठी नियमितपणे च्यवनप्राश खाणे हे लाभदायी आहे. एकाग्रता वाढण्यासाठी आणि मेंदूच्या सक्रियतेसाठी च्यवनप्राश खाणे हे फायदेशीर ठरते. 

Benefits Of Chyavanprash

पचनक्षमता सुधारते

च्यवनप्राशमध्ये असलेले गुणधर्म पचनक्षमता सुधारण्यास देखील मदत करतात. या गुणधर्मांमुळे पोटात गॅस होण्याची समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते. तसेच, पोट फुगणे, पोट जड होणे या समस्या दूर होतात.

Benefits Of Chyavanprash

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

च्यवनप्राशमध्ये अनेक पोषकतत्वांचा समावेश आढळतो. त्यामुळे, हे पोषकघटक आपले वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. च्यवनप्राशचे सेवन केल्याने आपल्याला वारंवार भूक लागत नाही. परिणामी भूकेवर नियंत्रण मिळवले जाते, ज्यामुळे, वजन कमी होण्यास मदत मिळते.

Benefits Of Chyavanprash

च्यवनप्राशमध्ये मोठ्या प्रमाणात अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल, अ‍ॅंटी-व्हायरल गुणधर्म आढळून येतात. हे गुणधर्म आपल्याला ताप, सर्दी, घसा आणि श्वसनाच्या इतर समस्यांचा सामना करण्यासाठी मदत करतात.

Benefits Of Chyavanprash

हिवाळ्यातील सुपरफूड आहे ब्रोकोली, जाणून घ्या 'हे' फायदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Benefits of Broccoli | esakal
येथे क्लिक करा.