Monika Lonkar –Kumbhar
आजकालचे धावपळीचे जीवन, जंक फूडचे वाढलेलेल सेवन, व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे लठ्ठपणाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या वाढत्या लठ्ठपणामुळे लोक त्रस्त झाले आहेत.
वजन कमी करण्यासाठी मखाने खाणे हे अतिशय उपयुक्त आहे.
मखान्यांमध्ये फायबर्स आणि प्रोटिन्सचे भरपूर प्रमाण आढळून येते. शिवाय, मखान्यांमध्ये कमी कॅलरीज आढळून येतात. त्यामुळे, वजन कमी करण्यासाठी देखील मखाने उपयुक्त आहेत.
मॅग्नेशिअमचा उत्तम स्त्रोत म्हणून मखान्याला ओळखले जाते. हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मॅग्नेशिअम हे महत्वाचे खनिज आहे.
मॅग्नेशिअममुळे आपल्या हृदयाचे ठोके आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. ज्यामुळे, हृदयाशी संबंधित असलेल्या रोगांचा धोका देखील कमी होतो. त्यामुळे, हृदयविकाराची समस्या असणाऱ्या लोकांनी आहारात मखान्यांचा समावेश करणे हे फायदेशीर ठरते.
मखान्यांचा आहारात समावेश केल्याने आपली पचनक्षमता सुरळीत राहण्यास मदत होते. पचनक्षमता सुरळीत राहिली की याचा फायदा वजन कमी करण्यासाठी आपोआप होतो.
मखान्यांमध्ये कॅलरीज आणि फॅट्सचे प्रमाण कमी आढळून येते. त्यामुळे, वजन कमी करण्यासाठी मखान्यांचा आहारात समावेश करणे हे फायद्याचे ठरते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.