मशरूम खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे मााहित आहेत का?

Monika Lonkar –Kumbhar

मशरूम्स

पौष्टिक घटकांनी परिपूर्ण असलेल्या मशरूम्सचे हिवाळ्यात सेवन करणे हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

benefits of mushrooms

हृदयासाठी फायदेशीर

मशरूम्समध्ये आढळून येणाऱ्या पोषकघटकांमुळे त्याचे सेवन करणे हे हृदयासाठी फायदेशीर आहे.

benefits of mushrooms

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

मशरूम हे अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असल्याने शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. 

benefits of mushrooms

डायबिटीजपासून आराम मिळतो

मशरूम्सचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे, डायबिटीजचा धोका कमी होतो.

benefits of mushrooms

त्वचेसाठी फायदेशीर

मशरूमचे सेवन केल्याने त्वचेचे आरोग्य ही चांगले राहते. मशरूममध्ये असलेल्या पोषकघटकांमुळे त्वचा मुलायम आणि हायड्रेडेट राहण्यास मदत होते.

benefits of mushrooms

वजन कमी होते

मशरूम्समध्ये लो कॅलरीज आढळून येतात, त्यामुळे, याचे सेवन करणे फायदेशीर ठरते. शिवाय, यामध्य फायबर्सचे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, वजन नियंत्रित राहते.

benefits of mushrooms

सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो

थंडीच्या दिवसांमध्ये सर्दी खोकल्याची समस्या निर्माण होते. ही समस्या दूर करण्यासाठी आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता मजबूत असणे महत्वाचे आहे. मशरूमचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि सर्दी, खोकल्यापासून आराम मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

benefits of mushrooms