Monika Lonkar –Kumbhar
निरोगी आरोग्य हवे असेल तर तुम्ही संतुलित आहार आणि व्यायाम नियमित करणे आवश्यक आहे. मात्र, सध्याचे धकाधकीचे जीवन आणि बिघडलेली जीवनशैली यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.
आजकाल कॉलेस्ट्रॉलच्या पातळीमध्ये वाढ होण्याचे प्रमाण वाढले आहे. कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यापूर्वी शरीरात काही लक्षणे दिसू लागतात.
आपल्या शरीरात कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढली की त्याचा परिणाम हा रक्तप्रवाहावर होतो. त्यामुळे, याचा थेट परिणाम हा त्वचेच्या रंगावर होतो.
आपल्या शरीरामध्ये कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढली की, शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. ही ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे पाय दुखू लागतात. पायांमध्ये तीव्र वेदना होण्यास सुरूवात होते.
शरीरातील हे वाढलेले कॉलेस्ट्रॉल पेरीफेरल आयटीएल डिसिझ (PAD) होण्याचे प्रमुख कारण बनू शकते. त्यामुळे, या परिस्थितीमध्ये रक्तवाहिन्या ब्लॉक होतात आणि रक्तप्रवाह मंद होतो. या सर्व कारणांमुळे पाय दुखू लागतात. शरीरात कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यामागचे हे प्रमुख लक्षण आहे.
जर शरीरात खराब कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढली की, उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते. बॅड कॉलेस्ट्रॉल वाढल्याने शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण होण्याची शक्यता असते.
उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण झाली की, या स्थितीमध्ये छातीत दुखणे, डोके दुखणे, थकवा, आळस येणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि उलट्या होणे इत्यादी लक्षणे दिसू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.