ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)
आपले निर्णय हे आपल्या आयुष्यात खुप महत्वाची भुमिका बजावतात, कारण ते निर्णय आपली परिस्थिती बदलतात.
आपल्या भावनांवर खुप जास्त अवलंबुन राहणे, भावना आणि तर्क यांचा समतोल नसणे.
निर्णय घेताना नेहमी पहिल्याच पर्यायाचा विचार करुन निर्णय घेणे, सर्व पर्यायांचा विचार करण्यासाठी वेळ न घेणे.
अनुभवी व्यक्तींनी दिलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करणे. यामुळे निर्णय घेणे आव्हानात्मक बनवू शकतात.
निर्णयाचा प्राधान्यक्रम, अतिविचार करण्यात मर्यादेपेक्षा जास्त वेळ घालवणे.
आपल्याला सध्या कशाला प्राधान्य द्यायचे आहे, हेच ठाऊक नसेल, तर आपल्याला जे साध्य करायचे आहे त्याच्याशी जुळणारे निर्णय घेणे कठीण हाेऊ शकते.
थकवा, तणावामुळे निर्णय घेण्याची क्षमता खराब होऊ शकते.
आपल्या जुन्या चुकांमधुन काहीच बोध न घेणे, मागील चांगले असो किंवा वाईट घेतलेल्या निर्णयांचे आणि झालेल्या परिणामांचे चिंतन न करणे.
इतरांकडुन येणारा दबाव, अपेक्षा, आत्मविश्वासाचा अभाव निर्णय घेण्यास अडथळा आणतात.