आरोग्यासाठी फायदेशीर आहेत सूर्यफुलाच्या बिया

Monika Lonkar –Kumbhar

सूर्यफूल

सूर्यफूल हे दिसायला जितके सुंदर आणि आकर्षक असते तितकेच ते आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते.

सूर्यफुलाच्या बिया

सूर्यफुलाच्या बियांमध्ये भरपूर औषधी गुणधर्म असतात, जे शरीराचा अनेक आजारांपासून बचाव करतात.

सूर्यफुलांच्या बियांमध्ये प्रथिने, कॅल्शियम यांसारख्या घटकांचा समावेश असतो. आज आपण जाणून घेऊयात सूर्यफुलाच्या बियांचे फायदे.

हाडांसाठी फायदेशीर

या बियांमध्ये मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन ई आणि इतर अनेक पोषक घटक आढळतात, ज्यामुळे हाडे निरोगी राहण्यास मदत होते.

तणाव कमी करते

सूर्यफुलांच्या बिया आपले मन शांत ठेवण्यास मदत करतात. यामध्ये असलेले मॅग्नेशिअम मेंदूसाठी फायदेशीर आहे.

पचनक्रिया निरोगी राहते

सूर्यफुलाच्या बियांमध्ये पुरेशा प्रमाणात फायबर आढळते, जे पचनसंस्था निरोगी ठेवण्याचे काम करते. या बियांचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.

हृदयाला ठेवते निरोगी

सूर्यफुलाच्या बियांमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आढळते, जे हृदयासाठी फायदेशीर आहे. या बियांचे नियमित सेवन केल्यास स्ट्रोकचा धोका टाळता येतो.

Benefits Of Mango : फळांचा राजा आहे आंबा, त्यात लपलाय आरोग्याचा खजिना

Benefits Of Mango | esakal
येथे क्लिक करा.