लहान मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी फॉलो करा ‘या’ आयुर्वेदिक टिप्स

Monika Lonkar –Kumbhar

व्यायाम

प्रौढांसोबतच लहान मुलांनी देखील रोज व्यायाम करणे गरजेचे आहे. व्यायाम नाही केला तर रोजच्या रोज मैदानी खेळ खेळले पाहिजेत.

Ayurvedic Tips for Children

एकाग्रता कमी होत चाललीयं

माहिती आणि मनोरंजनाचे अनेक पर्याय उपलब्ध झाल्यामुळे लहान मुले देखील एकलकोंडी होत चालली आहेत. त्यांची एकाग्रता कमी होत चालली आहे. त्यामुळे, अभ्यासात लक्ष न लागणे अशा तक्रारी सुरू झाल्या आहेत.

Ayurvedic Tips for Children

आयुर्वेद

आयुर्वेदामध्ये लहान मुलांची एकाग्रता वाढण्यासाठी आणि त्यांचे लक्ष केंद्रित होण्यासाठी काही आयुर्वेदिक टिप्स सांगितल्या आहेत. 

Ayurvedic Tips for Children

शंखपुष्पी

या आयुर्वेदिक औषधी वनस्पतीमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटकांचा आणि औषधी गुणधर्मांचा समावेश आढळतो. या वनसप्तीचा उपयोग स्मरणशक्ती वाढवण्यासाठी देखील केला जातो. तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी ही वनस्पती फायदेशीर आहे. 

Ayurvedic Tips for Children

असा करा वापर

एकाग्रता आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी शंखपुष्पीचा उपयोग केला जातो. या वनस्पतीचा उपाय करण्यासाठी अर्धा चमचा शंखपुष्पी एक ग्लास कोमट पाण्यात मिसळून त्याचे सेवन करू शकता.

Ayurvedic Tips for Children

ब्राह्मी

ब्राह्मी ही सर्वात प्राचीन वनस्पती आहे. ब्रेन टॉनिक म्हणून या वनस्पतीला ओळखले जाते. अनेक औषधांमध्ये या वनस्पतीचा आवर्जून वापर केला जातो. लहान मुलांची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी या वनस्पतीचा आवर्जून वापर केला जातो.

Ayurvedic Tips for Children

ब्राह्मीचा असा करा वापर

या वनस्पतीची ब्राह्मी पावडर मिळते. ही पावडर दूधात किंवा पाण्यात मिसळून याचे सेवन केले जाऊ शकते. याचे नियमित सेवन केल्याने लहान मुलांची एकाग्रता वाढण्यास मदत मिळू शकते.

Ayurvedic Tips for Children

अश्वगंधा

आयुर्वेदामध्ये या वनस्पतीला सर्वात प्राचीन आणि औषधी वनस्पती म्हणून ओळखले जाते. मानसिक आरोग्यासोबत, एकाग्रता वाढवण्यासाठी ही वनस्पती फायदेशीर ठरते. लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत सर्वांना ही वनस्पती फायदेशीर ठरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayurvedic Tips for Children