Dangerous Dogs : कुत्र्यांच्या सगळ्यात खतरनाक जाती, सिंहालाही फाडून खातील!

Sudesh

Rottweiler

रॉटवेलर जातीच्या कुत्र्यांना पाहूनच त्यांच्या ताकदीचा अंदाज येतो. एखाद्या बुलडोजर प्रमाणे मजबूत असा या कुत्र्यांचा बांधा असतो. यामुळे जगातील सर्वात ताकदवान प्राण्यांमध्ये याचा समावेश होतो.

Dangerous Dog Breeds | eSakal

Bloodhounds

नावातच दहशत असलेल्या या कुत्र्यांना उत्कृष्ट शिकारी म्हणून ओळखलं जातात. यांचं नाक अतिशय तीक्ष्ण असतं, त्यामुळे कित्येक देशांचे पोलीस यांचा वापर करतात. हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी हे प्रसिद्ध आहेत.

Dangerous Dog Breeds | eSakal

African Lion Hound

दक्षिण आफ्रिकेतील ही कुत्र्यांची प्रजाती आपल्या शिकारीला ताणून मारण्यासाठी ओळखली जाते. समोरचा प्राणी अगदी दमून जाईपर्यंत हे त्याचा पाठलाग सोडत नाहीत.

Dangerous Dog Breeds | eSakal

Dogo Argentino

अर्जेंटिनामधील ही कुत्र्यांची प्रजाती चक्क जंगली जनावरांची शिकार करते. २७ इंच उंची आणि १०० पाउंड वजन असलेले या कुत्र्यांचं शरीरही पिळदार असतं.

Dangerous Dog Breeds | eSakal

South African Mastiff

दक्षिण अफ्रिकेतील कुत्र्यांची ही आणखी एक डेंजर प्रजाती. आपल्या मालकाच्या सुरक्षेसाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात. वेळप्रसंगी सिंहालाही मारण्याची तयारी हे ठेवतात.

Dangerous Dog Breeds | eSakal

Cane Corso

या प्रजातीच्या कुत्र्यांची उंची सुमारे २८ इंच, आणि वजन तब्बल १२० पाउंड एवढे असते. एखाद्या सिंहासमोर हा लहान वाटला, तरी याची चावा घेण्याची क्षमता भरपूर जास्त आहे. एकदा याने तोंडात काही पकडलं, तर लचकाच तोडून काढल्याशिवाय हा शांत बसत नाही.

Dangerous Dog Breeds | eSakal

Fila Brasileiro

ब्राझीलमधील ही कुत्र्याची प्रजाती इतर तीन प्रजातींचं फ्युजन आहे. इंग्लिश मॅस्टिफ, ब्लडहाऊंड आणि बुलडॉग अशा तीन खतरनाक प्रजातींचं मिश्रण म्हणजे फिला ब्रासिलिएरो. या तीनही प्रजातींच्या कुत्र्यांचे सर्व तगडे फीचर्स या कुत्र्यात आहेत.

Dangerous Dog Breeds | eSakal

Wolf Dogs

याच्या नावातूनच लक्षात येतं की हा किती खतरनाक आहे. या प्रजातीचे कुत्रे लांडग्यांप्रमाणेच आक्रमक असतात. दिसायलाही लांडग्यांप्रमाणे असल्यामुळे यांना असं नाव देण्यात आलं आहे.

Dangerous Dog Breeds | eSakal

Turkish Kangal

या प्रजातीचे कुत्रे वुल्फ डॉगच्याच उंचीचे असतात. मात्र, यांचं वजन १४० पाउंड असतं. एका वेळी असे दोन-तीन कुत्रे आले, तर नक्कीच ते सिंहालाही पळवून लावू शकतात.

Dangerous Dog Breeds | eSakal

Neapolitan Mastiffs

इटलीमधील या प्रजातीचे कुत्रे दिसायला थोडे ओंगळवाणे वाटतात. मात्र, हे भरपूर फ्रेंडली असतात. चांगली ट्रेनिंग दिलेले निएपॉलिटन मॅस्टिफ हे कुटुंबाच्या सुरक्षेसाठी अगदी योग्य ठरतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dangerous Dog Breeds | eSakal