या ड्रिंक्समुळे तुमची हाडे होऊ शकतात मजबूत आणि निरोगी

Aishwarya Musale

हाडांचे आरोग्या

आपल्या सर्वांना माहित आहे की संपूर्ण आरोग्यासाठी हाडांचे आरोग्या चांगले असणे खूप महत्वाचे आहे. अनेकदा लोकांना असे वाटते की जिममध्ये जाऊन किंवा वजन उचलल्याने त्यांचे स्नायू आणि हाडे मजबूत होतात.

वर्कआउट

मात्र, तसे होत नाही. तुमच्या वर्कआउट रुटीन व्यतिरिक्त तुम्ही कोणत्या प्रकारचा आहार घेता हे खूप महत्वाचे आहे. अनेकदा लोक मजबूत हाडांसाठी कॅल्शियम युक्त पदार्थांचे सेवन करतात. मात्र, केवळ कॅल्शियमच्या मदतीने हाडे मजबूत होऊ शकत नाहीत.

यासाठी इतर पोषक घटकांकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. बरं, हाडे केवळ अन्न खाऊनच नव्हे तर काही पेयांच्या मदतीनेही मजबूत करता येतात. ही पेय कोणती आहेत ते आपण जाणून घेवूया.

ग्रीन टी

सामान्यतः असे मानले जाते की ग्रीन टी वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. मात्र, ग्रीन टी हाडांसाठी देखील फायदेशीर आहे. ग्रीन टीमध्ये कॅटेचिन आणि पॉलीफेनॉल सारखी संयुगे असतात. ही संयुगे हाडांची निर्मिती सुधारतात, हाडे मजबूत करतात.

दूध

सर्वजण हाडे मजबूत करण्यासाठी दुधाचे सेवन करतात. दूध केवळ कॅल्शियमचेच नाही तर व्हिटॅमिन डी आणि फॉस्फरसचेही उत्कृष्ट स्रोत मानले जाते.

हाडांच्या संरचनेसाठी कॅल्शियम आवश्यक असताना, व्हिटॅमिन डी कॅल्शियम शोषण्यास मदत करते.

स्मूदीज

हाडे मजबूत करण्यासाठी स्मूदीजचे सेवन करणे देखील चांगले मानले जाते. विशेषत: दही आणि दुधाशिवाय पालक आणि काही हिरव्या पालेभाज्यांचा समावेश केल्यास त्याचा हाडांवर खूप चांगला परिणाम होतो.

भाज्यांचा ज्यूस

हाडांचे आरोग्य मेंटेन ठेवायचे असेल तर भाज्यांचा रस पिऊ शकता. भाज्यांच्या रसामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन के आणि इतर अनेक खनिजे असतात. या पोषक तत्वांमुळे तुमची हाडे मजबूत होतात.

आधी केलं इग्नोर.. नंतर जडलं प्रेम! अशी होती सानियाची लव्हस्टोरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा