Monika Lonkar –Kumbhar
थंडीचे दिवस सुरू झाले की आपल्याला त्वचेची खास काळजी घ्यावी लागते. त्यातल्या त्यात कोरड्या त्वचेची या दिवसांमध्ये खास काळजी घेणे गरजेचे असते.
हिवाळ्यात त्वचेला जास्त मॉईश्चराईझ केल्यामुळे चेहऱ्यावर मृत त्वचा जास्त प्रमाणात जमा होऊ लागते. त्यामुळे, त्वचेचे स्क्रब करण्याची गरज पडू शकते.
कोरड्या त्वचेवर कोणतेही स्क्रब केल्याने त्वचा आणखी कोरडी होण्याचा धोका असतो. कोणतेही स्क्रब करण्यापूर्वी ते आधी तुमच्या त्वचेला सूट होते का ? हे पाहणे महत्वाचे ठरते.
कोरफड ही सर्व प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे.
ओट्समध्ये असलेल्या पोषकघटकांमुळे ते चेहऱ्याला खोलवर साफ करण्यास मदत करते.
हे स्क्रब करण्यासाठी कोरफडचा गर घ्या आणि त्यामध्ये ३ चमचे ओट्स पावडर घ्या. आता, हे दोन्ही घटक चांगले मिक्स करा. आता या मिश्रणाने चेहऱ्यावर हलक्या हाताने १० मिनिटे स्क्रब करा. त्यानंतर, २० मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवून टाका.
ओट्स आणि कोरफडीचे हे स्क्रब चेहऱ्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. या स्क्रबमुळे चेहऱ्यावर छान ग्लो येतो आणि मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.