Aishwarya Musale
पावसाळा सुरु झाल्यावर अनेक संसर्गाचा धोका असतोच त्यामुळे आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्हीही पावसात वारंवार आजारी पडता का?
तुम्हाला कोणत्याही प्रकारचा संसर्ग होण्याची भीती वाटते का? थोड्या थंडीमुळे तुमची प्रकृती गंभीर झाली असं वाटत असेल तर तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे असं समजा.
वारंवार आजारी पडणे, सतत थकवा जाणवणे, पचन समस्या, पोटात जळजळ होणे.
जास्त साखर खाल्ल्याने रोगप्रतिकारक पेशींची क्रिया कमी होते. अशा वेळी नैसर्गिक गोड पदार्थांचं सेवन करा. जसे की, फळं. मिठाईचे सेवन मर्यादित करा.
प्रक्रिया केलेल्या अन्नामध्ये अनेकदा अस्वास्थ्यकर चरबी, सोडियमची उच्च पातळी आणि कृत्रिम पदार्थ असतात. हे घटक शरीरातील जळजळ वाढवू शकतात.
अल्कोहोलचे अतिसेवन देखील रोगप्रतिकारक पेशी कमकुवत करू शकते. यामुळे पौष्टिकतेची कमतरता होऊ शकते. झोपेची पद्धत विस्कळीत होऊ शकते. शरीराला सूज येऊ शकते.
पावसाळ्यात तसेही तळलेले पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण यात अनेकदा अनहायजेनिक ट्रान्स फॅट्स आणि सोडियमचे प्रमाण जास्त असते.
सामान्यतः प्रक्रिया केलेले मांस, फास्ट फूड आणि पॅक्ड फूडमध्ये भरपूर सोडियम असते. याचे सेवन केल्याने शरीरात जळजळ होऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.