रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्यास 'हे' खाद्यपदार्थ करतील मदत

Monika Lonkar –Kumbhar

आहार

निरोगी जीवनशैलीसाठी संतुलित आहार घेणे अतिशय महत्वाचे आहे.

रक्त

शरीरातील रक्त अनेक प्रकारचे कार्य करते. शरीरातील सर्व अवयवांपर्यंत ऑक्सिजन पोहचवण्याचे काम रक्त करते.

ऑक्सिजनची पातळी

अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करून रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात अशाच काही पदार्थांबद्दल.

हळद

अन्नाची चव वाढवण्याव्यतिरिक्त, हळद नायट्रिक ऑक्साईडची पातळी वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांचा विस्तार होतो आणि रक्तप्रवाह सुधारतो.

डाळिंब

डाळिंब हे लोह, तांबे, जस्त आणि अत्यावश्यक खनिजांचे पॉवरहाऊस आहे, जे महत्वाच्या अवयवांना आणि पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास मदत करते.

पालक

पालकमध्ये लोहाचे भरपूर प्रमाण असते. नायट्रेटचा समृद्ध स्रोत असलेली पालक संपूर्ण शरीरात रक्तप्रवाह आणि ऑक्सिजन वाढविण्यास मदत करते.

अ‍ॅव्होकॅडो

अ‍ॅव्होकॅडोमध्ये असलेली जीवनसत्त्वे, खनिजे, फोलेट असतात, जे रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यास मदत करतात.

उन्हाळ्यात चहा-कॉफीच्या जागी काय प्यायला हवे?

Summer drinks | esakal
येथे क्लिक करा.