सकाळ डिजिटल टीम
आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन्सची खूप गरज असते. व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे आपली इम्युनिटी कमी व्हायला लागते ज्यामुळे थकवा जाणवू लागतो.
इम्युनिटी वाढवण्यासाठी तज्ञांनी व्हिटॅमिन सीचे सेवन करण्याचा सल्ला देतात.
संत्रामध्ये व्हिटॅमिन सी असते हे आपल्याला माहीतच आहे. पण त्याव्यतिरिक्त अजून काही फळांमधून आपल्याला व्हिटॅमिन सी मिळते.
पेरूमध्ये इतर पोषकतत्त्वांसोबतच व्हिटॅमिन सी सुध्दा जास्त प्रमाणात आढळून येते. हे इम्युनिटीसोबत ब्लड शुगर सुरळीत ठेवण्यास मदत करतात.
अननस इम्युनिटी वाढवण्यास आणि सूज कमी करण्यास मदत करते. यात व्हिटॅमिन बी-६, पोटॅशिअम, तांब आणि थायमिन सारख्या पोषक तत्त्वांसोबतच व्हिटामिन सी आढळते.
कीवीमध्ये फायबरसह व्हिटॅमिन सी सुद्धा असते. यामुळे पचनसंस्था मजबूत व्हायला मदत होते.
पपईमध्ये असलेल्या अनिऑक्सिडन्ट सह व्हिटॅमिन सी सुद्धा आढळते. याचा रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी फायदा होतो.
तज्ञांच्या मते शिमला मिरचीमध्ये अंदाजे १५२ ग्राम एवढे व्हिटॅमिन सी उपलब्ध असते.