'या' फळांच्या सालीही असतात आरोग्यासाठी उत्तम!

Aishwarya Musale

एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये किंवा एखाद्या पॉश ठिकाणी गेलं की फळे सोलून, कापून ती ताटात ठेवलेली असतात. मग लोक ती फळे काटा चमच्याने खातात.

स्टाईलच्या नावाखाली असे अनेक प्रयोग केले जातात. पण प्रत्यक्षात फळांच्या सालीचे खूप अनेक फायदे असतात. कोणती फळे आहेत ही जी सोलून खाऊ नयेत?

पेर

पेर हे फळ नेहमी सालीसकट खावं. पेर च्या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे आढळतात. काही फळांचं साल काढू नये, त्या फळांना सालीसकट खावं त्यांच्या सालीमध्ये सुद्धा अनेक फायदे असतात. यात डायटरी फायबर असतं.

सफरचंद

रोज एक सफरचंद खा असं आपल्याला नेहमी सांगितलं जातं. तुम्ही जर सफरचंद खात असाल तर ते सालीसकट खा! अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर असे गुणधर्म सफरचंदाच्या सालीत असतात.

पेरू

पेरू सालीबरोबर खावा. पेरूमध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.

नुसता पेरूच नाही तर त्याच्या सालीचे देखील आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

किवी

किवीचे सेवन आपल्या हाडांसाठी देखील फायदेशीर आहे, यामुळे सांधेदुखी दूर होते. जे लोक मानसिक समस्यांना बळी पडतात त्यांनी तणाव कमी करण्यासाठी किवी खाणे आवश्यक आहे.

किवीमुळे आपली रोगप्रतिकारशक्ती खूप वाढते, यामुळे अनेक आजार आणि इन्फेक्शनचा धोका कमी होतो.

गरोदरपणात हाय हिल्स घालाव्यात की नाही?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा