हिवाळ्यात तुमचेही केस खूप गळतात? मग, ‘या’ घरगुती उपायांची घ्या मदत

Monika Lonkar –Kumbhar

हिवाळा

हिवाळ्यात आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे, आपण सर्वजण आरोग्याची खास काळजी घेतो. 

hair care tips

मात्र, त्वचेची आणि केसांची म्हणावी तशी काळजी घेत नाही. या दिवसांमध्ये वातावरणाचा केसांवर आणि त्वचेवर ही परिणाम होतो. 

hair care tips

त्वचा आणि केस

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते आणि केस कोरडे आणि फ्रिझी होऊ लागतात. मात्र, यासोबतच केस मोठ्या प्रमाणात गळतात.

hair care tips

केसगळती

ही केसगळती रोखण्यासाठी महिला मग मार्केटमधील अनेक महागडे शॅंम्पू, कंडिशनर्स आणि हेअर सिरम्सचा वापर करतात. परंतु, यामुळे, केसांना तात्पुरता फरक पडतो. त्यानंतर, काही दिवसांमध्येच केस पुन्हा गळायला लागतात.

hair care tips

केसगळतीवर उपाय

थंडीच्या दिवसांमध्ये अनेक महिलांचे केस खराब होतात. केस तुटण्यासोबतच ते जास्त प्रमाणात गळतात. या समस्यांनी त्रस्त असाल तर सर्वात आधी २ चमचे व्हिनेगर घ्या.

hair care tips

व्हिनेगरमध्ये १ अंडे फेटून घाला. हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे मिसळा आणि केसांना लावा. जवळपास अर्ध्या तासानंतर केस धुवा. हा उपाय केल्याने तुमची खराब केसांची समस्या दूर होण्यास मदत होईल. 

hair care tips

केसांसाठी चहापावडरचा उपाय

हा उपाय करण्यासाठी सर्वात आधी वापर करण्यात आलेली चहापावडर एका भांड्यात घ्या. त्यानंतर, त्यात पाणी मिसळून ते पाणी पुन्हा उकळा. त्यानंतर, चहापावडरचे हे पाणी गाळून घेऊन ते थंड करायला ठेवा. आता या थंड झालेल्या चहापावडरच्या पाण्यात लिंबाचा रस मिसळा आणि या पाण्याने तुमचे केस धुवा. 

hair care tips

केसांच्या वाढीसाठी 'हे' व्हिटॅमिन्स आहेत फायदेशीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

vitamins for hairs | esakal
येथे क्लिक करा.