उन्हाळ्यात केस खराब होतात? मग, फॉलो करा सोप्या टिप्स

Monika Lonkar –Kumbhar

उन्हाळा

देशात दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

उन्हाळ्यात आरोग्यासोबतच त्वचेची आणि केसांची काळजी घेणे गरजेचे आहे.

उन्हाच्या अतिनील किरणांमुळे त्वचा टॅन होते. त्यामुळे, चेहरा काळपट दिसू शकतो. उन्हाचा परिणाम केसांवर ही होऊ शकतो.

हेअर मास्कचा करा वापर

केस कोरडे होणे आणि केसगळतीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही हेअर मास्कचा वापर करू शकता.

स्कार्फचा वापर करा

उन्हाळ्यात केसांची देखभाल करण्यासाठी आणि केसांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी स्कार्फचा अवश्य वापर करा. 

कंडिशनर लावा

केसांचे संरक्षण करण्यासाठी केसांना शॅंम्पू लावल्यानंतर कंडिशनरचा अवश्य वापर करा. यामुळे, केस मुलायम होण्यास मदत होते आणि केसांना छान पोषण ही मिळते.

मोठ्या कंगव्याचा करा वापर

उन्हाळ्यात तुमच्या केसांसाठी रूंद-दात असलेला कंगव्याचा वापर अवश्य करा. कंगव्याने केस विंचरण्यापूर्वी केसांना हेअर सीरम लावा. यामुळे, केस तुटणार नाहीत. 

उन्हाळ्यात डिहायड्रेशनपासून बचाव करण्यासाठी आरोग्याची अशी घ्या काळजी

येथे क्लिक करा.