Monika Lonkar –Kumbhar
सुंदर आणि दाट केसांसाठी केसांची छान काळजी घेणे गरजेचे आहे.
परंतु, आजकाल बिघडलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, आणि प्रदूषणामुळे केसांच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.
मग, या केसांच्या समस्या दूर करण्यासाठी आणि केसांना मजबूत करण्यासाठी तुम्ही तेलाची मदत घेऊ शकता.
केसांच्या उत्तम वाढीसाठी आणि दाट केसांसाठी आठवड्यातून किमान २ वेळा जोजोबा तेलाने मसाज करणे आवश्यक आहे.
त्वचेच्या आणि केसांच्या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही नारळतेलाची मदत घेऊ शकता. यामुळे, केसांचे छान पोषण होते.
ऑलिव्ह ऑईल केसांसाठी अतिशय लाभदायी आहे. हे केसांची वाढ आणि नुकसान नियंत्रित करण्यास मदत करते.
व्हिटॅमिन ई ने समृद्ध असलेल्या बदाम तेलाने केसांचा मसाज केल्याने केसांना संपूर्ण पोषण मिळते, ज्यामुळे केस मुळांपासून मजबूत होतात.