प्रथिनांचे ‘पॉवरहाऊस’ आहे चवळी; जाणून घ्या 'हे' आरोग्यदायी फायदे

Monika Lonkar –Kumbhar

चवळी

चवळीमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वांचा समावेश आढळून येतो. चवळी हे एक सुपरफूड असून चवळीला प्रथिनांचे पॉवरहाऊस असे म्हटले जाते.

benefits of lobia | esakal

प्रथिने

विविध प्रकारच्या डाळी, अंडी, चिकन, दूध, मांस इत्यादी घटकांना प्रथिनांचा प्रमुख स्त्रोत म्हणून ओळखले जाते. यामध्ये चवळीचा ही समावेश आहे.

benefits of lobia

आहार

चवळीमध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स आणि इतर पोषक घटक आढळून येतात. चवळीमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटक असल्यामुळे चवळीचा प्रामुख्याने आहारात समावेश केला जातो. 

benefits of lobia

चवळीची भाजी, आमटी आणि इतर अनेक खाद्यपदार्थ चवळीपासून बनवले जातात. आरोग्यासाठी लाभदायी असणाऱ्या चवळीचे फायदे आज आपण जाणून घेणार आहोत.

benefits of lobia

वजन कमी करण्यासाठी लाभदायी

चवळीचे सेवन केल्यावर आपले पोट लवकर भरते. त्यामुळे, भूक कमी लागते. चवळीमुळे आपल्या शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तसेच, चवळीमधील जीवनसत्वे आणि इतर पोषकघटक वजन कमी करण्यास मदत करतात.

benefits of lobia

शरीराला डिटॉक्स करण्यासाठी लाभदायी

चवळीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. ज्यामुळे, आपले शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. शिवाय, विषारी घटक बाहेर पडल्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते.

benefits of lobia

मधुमेहींसाठी फायदेशीर

चवळीमध्ये असलेल्या पोषकघटकांमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे, मधुमेहींसाठी चवळीचा आहारात समावेश असणे महत्वाचे आहे.

benefits of lobia

वजन कमी करायचे आहे? मग, आहारात समाविष्ट करा 'हे' झीरो कॅलरीज फूड्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

zero calorie foods | esakal
येथे क्लिक करा.