Monika Lonkar –Kumbhar
जेव्हा आपल्याला कधी उचकी येते तेव्हा आपल्याला वाटते की, कुणीतरी आपली खूप आठवण काढतयं. मात्र, हीच उचकी जर वारंवार येत राहिली तर मग आपली खूप चिडचिड होते. हे तितकेच खरे आहे.
उचकी थांबवण्यासाठी तुम्ही आल्याचा वापर करू शकता. उचकी थांबवण्यासाठी तुम्ही ताज्या आल्याचे एक-दोन छोटे तुकडे तोंडात धरले असता तुमची उचकी लगेच थांबेल.
आपल्या आरोग्यासाठी लाभदायी असणाऱ्या तुळशीचे अनेक फायदे आहेत. उचकी थांबवण्यासाठी तुम्ही तुळशीची देखील मदत घेऊ शकता.
उचकी थांबवण्यासाठी १ छोटा चमचा तुळशीचा रस घ्या. त्यामध्ये, आता अर्धा चमचा मध घाला. हे दोन्हींचे मिश्रण चाटल्यास तुमची उचकी थांबण्यास मदत होईल.
आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या मुळ्यामध्ये पोषकघटकांचे भरपूर प्रमाण आढळून येते. मुळ्यासोबतच मुळ्याची पाने देखील आरोग्यासाठी लाभदायी आहेत.
मुळ्याची पाने चावून खाल्ल्यास तुमची उचकी थांबू शकेल.
स्वयंपाकघरात हमखास वापरल्या जाणाऱ्या पुदिनाचा उपाय तुम्ही उचकी थांबण्यासाठी करू शकता. त्यासाठी, पुदिन्याची पाने स्वच्छ धुऊन घ्या. त्यानंतर ही पाने तोंडात धरली असता उचकी लगेच थांबेल.