मऊ आणि चमकदार त्वचा हवी आहे ? मग, टोमॅटोपासून बनवा ‘हे’ होममेड स्क्रब्स

Monika Lonkar –Kumbhar

टोमॅटो

टोमॅटोमुळे खाद्यपदार्थांना छान चव येते. टोमॅटो नसेल तर आपले स्वयंपाकघर देखील अधुरे वाटते. एवढा आपल्या आयुष्यात टोमॅटो महत्वाचा झाला आहे. 

tomato face scrubs

टोमॅटोमध्ये पोषणतत्वांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून येते. त्यामुळे, आरोग्यासोबतच त्वचेसाठी आणि केसांसाठी देखील टोमॅटो फायदेशीर आहे.

tomato face scrubs

टोमॅटोपासून स्क्रब्स

टोमॅटोचा वापर करून बनवलेले स्क्रब आणि फेसपॅक आपल्या त्वचेसाठी अतिशय लाभदायी आहे. त्वचेतील टॅनिंग, मृत त्वचा काढून टाकण्याचे काम टोमॅटो करतो,आज आपण टोमॅटोपासून बनवल्या जाणाऱ्या फेस स्क्रब्सबद्दल जाणून घेणार आहोत.

tomato face scrubs

टोमॅटो आणि कोरफड फेस स्क्रब

कोरफड आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे. या फेस स्क्रबसाठी २ चमचे टोमॅटोचा रस घ्या. त्यामध्ये कोरफड जेल एकत्र करा, आता तुमचे फेस स्क्रब तयार आहे.

tomato face scrubs

या स्क्रबने चेहऱ्यावर १० मिनिटे मसाज करा. त्यानंतर १५ मिनिटांसाठी चेहरा तसाच ठेवा, नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.

tomato face scrubs

टोमॅटो आणि मधाचे फेसस्क्रब

मधामुळे आपल्या त्वचेला छान ग्लो येतो. हे फेस स्क्रब बनवण्यासाठी एक पिकलेले टोमॅटो घ्या. आता त्यामध्ये ३ चमचे दही, १ चमचा मध आणि २ चमचे कोको पावडर घ्या. 

tomato face scrubs

आता हे सर्व मिश्रण एकत्र करा, तुमचे स्क्रब तयार आहे. या स्क्रबने चेहऱ्यावर १५ मिनिटे मसाज करा, नंतर चेहरा धुवून टाका.

tomato face scrubs

टोमॅटो आणि मधाच्या फेसस्क्रबचा उपाय जर तुम्ही आठवड्यातून किमान २ वेळा जरी केला तर तुमच्या चेहऱ्यावर छान चमक येण्यास मदत होईल.

tomato face scrubs

रिकाम्या पोटी प्या हिंगाचे पाणी, झपाट्याने होईल वजन कमी

hing water
येथे क्लिक करा.