Monika Lonkar –Kumbhar
स्क्रिनवर जास्त वेळ काम केल्याने आणि कामाचा अधिकचा ताण घेतल्याने डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात.
बराच काळापर्यंत लॅपटॉपच्या स्क्रिनवर काम करणे, कामाचा ताण घेणे आणि रात्रीचे जागरण करणे, इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या आणि त्वचेच्या समस्या सुरू होतात.
स्क्रिनवर जास्त वेळ काम केल्याने आणि कामाचा अधिकचा ताण घेतल्याने डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात. त्यामुळे, चेहरा निस्तेज आणि डल दिसतो.
डोळ्यांखालील त्वचा ही अतिशय संवेदनशील असते. त्यामुळे, ही त्वचा लवकर प्रभावित होते. आजकाल डोळ्यांखाली काळी वर्तुळे येण्याचे प्रमाण वाढले आहे. ही समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपायांची मदत घेतली जाऊ शकते.
कॉफी आपल्या त्वचेसाठी अतिशय उत्तम प्रकारे काम करते. चेहऱ्यावरील फेस मास्क, फेस स्क्रब्समध्ये कॉफीचा आवर्जून वापर केला जातो. डो
डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी तुम्ही कॉफी आणि मधापासून आय मास्क बनवू शकता. मधामुळे त्वचा उजळण्यास मदत होते आणि त्वचा फ्रेश दिसते.
कॉफी आणि मधाचा हा आयमास्क बनवण्यासाठी सर्वात आधी एका बाऊलमध्ये २-३ चमचे कॉफी पावडर घ्या. त्यामध्ये १-२ चमचे मध मिसळा. याची चांगल्या प्रकारे पेस्ट तयार करा आणि डोळ्यांखाली ही पेस्ट लावा. त्यानंतर १५-२० मिनिटे ही पेस्ट तशीच ठेवा. त्यानंतर, चेहरा धुवून टाका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.