Monika Lonkar –Kumbhar
आपला लूक स्टायलिश दिसावा? असे प्रत्येक महिलेला वाटते. मग, स्टायलिश दिसण्यासाठी केवळ स्टायलिश आऊटफीट हवा, असे अजिबात नाही.
स्टायलिश दिसण्यासाठी तुमच्या आऊटफीटसोबतच तुमची हेअरस्टाईल, तुमची ज्वेलरी आणि तुमचा मेकअप देखील तितकाच महत्वाचा असतो.
जेव्हा या सर्व गोष्टी जुळून येतात, तेव्हा खरे तर तुमचा लूक स्टायलिश दिसतो. स्टायलिश लूक करताना तुम्हाला मेकअपची देखील विशेष काळजी घ्यावी लागते.
मेकअपबद्दल बोलायचे झाल्यास महिला खास करून लिपस्टिक लावण्यावर भर देतात. मात्र, गुलाबी रंगाच्या कपड्यांवर कोणती लिपस्टिक लावावी? असा प्रश्न अनेक तरूणींना पडतो. तुम्ही चिंता करू नका, आज आम्ही तुम्हाला गुलाबी रंगाच्या कपड्यांवर खुलून दिसणाऱ्या लिपस्टिक शेड्सबद्दल सांगणार आहोत.
जर तुम्ही दिवसा डेटवर किंवा कोणत्याही कार्यक्रमात जाणार असाल आणि फिकट गुलाबी रंगाचा ड्रेस किंवा साडी परिधान करणार असाल तर पीच कलरची लिपस्टिकची शेड ट्राय करू शकता.
यामध्ये लिपस्टिकचा मॅट फिनिश लूक निवडायला विसरू नका. फिकट गुलाबी रंगाच्या ड्रेसवर लिपस्टिकचा हा शेड अधिक खुलून दिसतो.
जर तुम्ही ब्लश पिंक कलरची किंवा बेबी पिंक कलरची साडी किंवा आऊटफीट परिधान करणार असाल तर त्यावर ब्लश पिंक कलरची लिपस्टिक खूपच सुंदर दिसेल. यात काही शंका नाही. अभिनेत्री क्रिती सेनॉन या पिंक साडीवर मॅच होणारी बल्श पिंक कलरची लिपस्टिक लावली आहे.