तुमच्या शरीरात मॅग्नेशिअमची कमतरता आहे? मग, आहारात ‘या’ खाद्यपदार्थांचा करा समावेश

Monika Lonkar –Kumbhar

निरोगी जीवनशैली

निरोगी जीवनशैलीसाठी दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यातील एक म्हणजे नियमितपणे व्यायाम आणि दुसरी म्हणजे संतुलित आहार होय. 

Magnesium rich foods

संतुलित आहार

आपल्या संतुलित आहारामध्ये शरीराला आवश्यक असणारे कॅल्शिअम, लोह, प्रथिने आणि जीवनसत्वे इत्यादी घटकांनी युक्त असलेले खाद्यपदार्थ असणे गरजेचे आहे.

Magnesium rich foods

मॅग्नेशिअम

मात्र, यासोबतच आपल्या मानसिक आरोग्यासाठी महत्वाचे असणारे पोषकतत्व म्हणजे मॅग्नेशिअम होय. ज्याबद्दल फार कमी लोकांना माहित असेल. मॅग्नेशिअम हे पोषकतत्व आपल्या शरीरातील स्नायू तयार करण्यास आणि नसा निरोगी ठेवण्यास मदत करते. 

Magnesium rich foods

शरीरात मॅग्नेशिअमची जर कमतरता असेल तर शरीराच्या काही भागांमध्ये मुंग्या येणे, बधीरपणा, स्नायू क्रॅम्प्स, व्हेरिकोज व्हेन्स, भूक न लागणे, दमा, निद्रानाश, अशक्तपणा इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. आपल्या शरीरातील मॅग्नेशिअमची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही काही खाद्यपदार्थांची मदत घेऊ शकता. 

Magnesium rich foods

ज्वारी

ज्वारीमध्ये फायबर्स आणि मॅग्नेशिअमचे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, ज्वारीची भाकरी किंवा ज्वारीचा वापर करून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने शरीराला मॅग्नेशिअमचा पुरवठा होतो. 

Magnesium rich foods

शिवाय, यामुळे, शरीरातील मॅग्नेशिअमची कमतरता भरून काढण्यास मदत होते. त्यामुळे, तुमच्या आहारात ज्वारीच्या भाकरीचा जरूर समावेश करा.

Magnesium rich foods

केळी

केळ्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम आढळून येते. आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी आणि शरीरातील हाडांना बळकटी मिळवून देण्यासाठी केळी हा अत्यंत चांगला पर्याय आहे.

Magnesium rich foods

काजू-बदाम

शरीराला आवश्यक असणारे प्रथिने, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फायबर्स इत्यादी पोषकघटक आपल्याला काजू-बदामचे सेवन केल्याने मिळतात. त्यामुळे, रोज मूठभर काजू-बदामचे सेवन करा. यामुळे, शरीरातील मॅग्नेशिअमची कमतरता भरून काढण्यास मदत मिळेल.

Magnesium rich foods

हिवाळ्यातील सुपरफूड आहे बाजरी, जाणून घ्या 'हे' आरोग्यदायी फायदे

benefits of bajra
येथे क्लिक करा.