केसांचा फ्रिझीनेसपणा कमी करण्यासाठी 'या' नैसर्गिक तेलांचा करा वापर

Monika Lonkar –Kumbhar

हिवाळा

कडाक्याच्या थंडीला सुरूवात झाली आहे. थंडीमध्ये त्वचेसोबतच केसांची ही खास काळजी घ्यावी लागते. वातावरणातील बदलामुळे केसांवर ही याचा परिणाम होतो.

hair care tips

थंड वातावरणामुळे केस कोरडे आणि निस्तेज दिसू लागतात. त्यामुळे, या दिवसांमध्ये केसांचा फ्रिझीनेसपणा देखील वाढतो. 

hair care tips

ही समस्या टाळण्यासाठी विविध प्रकारचे शॅंम्पू आणि हेअर सीरम्सचा वापर केला जातो. मात्र, केसांचा फ्रिझीनेसपणा कमी करण्यासाठी आपण काही नैसर्गिक तेलांचा ही वापर करू शकतो.

hair care tips

नारळाचे तेल

नारळाच्या तेलामध्ये मॉईश्चरायझिंग गुणधर्म भरपूर असतात. या तेलाने केसांचा मसाज केल्याने केसांमधील कोरडेपणा दूर होण्यास मदत होते. तसेच, केसांचा पोत मजबूत होतो आणि केसांशी संबंधित इतर समस्या दूर होतात.

hair care tips

बदामाचे तेल

केसांमधील वाढलेला कोरडेपणा आणि फ्रिझीनेसपणा कमी करण्यासाठी बदामाचे तेल फायदेशीर आहे. या तेलामध्ये आढळून येणाऱ्या पोषकतत्वांमुळे केसांमधील फ्रिझीनेसपणा दूर होण्यास मदत होते. तसेच, केसांची चांगल्या प्रकारे वाढ होते.

hair care tips

मसाज

या तेलाने आठवड्यातून ३ वेळा केसांचा मसाज करा. तसेच, केस धुतल्यानंतर आफ्टर वॉश हेअर सीरम म्हणूनही तुम्ही या तेलाचा वापर करू शकता.

hair care tips

टी ट्री ऑईल

केसांमधील वाढत्या कोरडेपणामुळे केसांमध्ये कोंड्याची समस्या ही वाढू शकते. त्यामुळे, केसांचा हा कोरडेपणा आणि फ्रिझीनेसपणा कमी करण्यासाठी टी ट्री ऑईलचा अवश्य वापर करा. या तेलाचा वापर केल्याने केसांची छान वाढ होते आणि केसांचा फ्रिझीनेसपणा कमी होतो.

hair care tips

गुलाबाची कळी, जणू हळदीनं माखली...!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sonam kapoor | esakal
येथे क्लिक करा.