सकाळ डिजिटल टीम
लिंबू आणि मध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्ससारखे अनेक पोषक घटक आढळतात.
परंतु, असं असूनही काही लोकांनी लिंबू आणि मधाच्या पाण्याचे सेवन करू नये.
ज्या लोकांना शरीराच्या हाडांमध्ये दुखत असेल किंवा कोणत्याही प्रकारची समस्या असेल, त्यांनी लिंबू आणि मधाचे पाणी पिणे टाळावे.
या लोकांनी लिंबू पाण्यात मध मिसळून पिऊ नये. ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे.
जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल, तर लिंबू-मध पाणी पिऊ नये. यामुळे तुमच्या आरोग्याच्या समस्या वाढू शकतात.
अल्सरची समस्या असल्यास लिंबू आणि मधाचे पाणी पिऊ नये. यामुळे तुमची समस्या खूप वाढू शकते.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ज्या लोकांना ॲसिडिटी आणि गॅसची समस्या आहे, त्यांनी लिंबू पाणी पिणे टाळावे.
जर तुम्हाला ॲसिडीटी आणि गॅस सारख्या समस्या वारंवार होत असतील, तर हे पाणी तुमच्यासाठी खूप हानिकारक ठरु शकते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.