नमिता धुरी
कंचनजंगा पर्वत -
हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे. येथील हिरवळ आणि डोंगररांगा मनमोहक आहेत.
माऊंट सिनिओन्चु -
कंचनगंगाजवळ ग्रीन लेक परिसरात असलेला हा डोंगर सर्वांत सुंदर डोंगर म्हणून ओळखला जातो.
माऊंट पंडिम -
या डोंगरावरून सिक्कीमच्या डोंगररांगा पाहाता येतात. इथे तुम्ही गिर्यारोहण करू शकता.
कंचनजंगा राष्ट्रीय उद्यान -
हिमालयाच्या कुशीत वसलेल्या राष्ट्रीय उद्यानाला २०१६ साली युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे.
कंचनजंगा धबधबा -
येथे ग्रॅनाईटच्या डोंगरातून धबधबा वाहातो.
माऊंट पौहुनरी -
या बर्फाळ शिखरावरील वातावरण मनमोहक असते.
ताशी व्ह्यू पॉइंट -
हे ठिकाण गंगटोकपासून ८ किमी अंतरावर आहे.
पेमयांग्त्से मठ -
६ हजार ८४० फूट उंचावर असलेला पेमयांग्त्से मठ १८व्या शतकातील असून येथे बौद्ध मूर्ती आणि इतर कलाकृती आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.