या कारणांमुळे इम्यूनिटी होते वीक, तुम्हाला 'ही' लक्षणं दिसत असतील तर व्हा सावध

Aishwarya Musale

निरोगी

स्वस्थ आणि निरोगी राहायचं असेल तर आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहणं गरजेचं असतं. रोगप्रतिकारक शक्ती हे एक असं शास्त्र आहे, जे आपल्याला बाहेरील बॅक्टेरियल, व्हायरल, इन्फेक्शन आदींपासून शरीराला सुरक्षित ठेवतं.

खरंतर, रोगप्रतिकारक शक्ती शरीराला अनेक प्रकारच्या रोगांशी जोरदारपणे लढण्याची क्षमता देते. ज्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आणि मजबूत असते ते कमी आजारी पडतात. त्यांचे शरीर दीर्घायुष्यासाठी निरोगी राहते.

ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे, ते बरेचदा आजारी पडतात. त्यांचे शरीर संक्रमणाशी लढू शकत नाही. रोगप्रतिकार शक्ती कमकुवत करणारे काही घटक आहेत. जेव्हा तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, तेव्हा काही लक्षणे देखील दिसतात.

स्ट्रेस

अनेक कारणांमुळे प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते, यातील मुख्य घटक म्हणजे स्ट्रेस, भीती, चिंता आणि टाइम प्रेशर. अशा परिस्थितीत तुम्ही जितका कमी ताण घ्याल तितकी तुमची निरोगी राहण्याची शक्यता वाढते.

मेटल टॉक्सिसिटी

अनेकदा वातावरणात काही हानिकारक घटक असतात. प्रदूषण, पेंट, पॉलिश, शॅम्पू, स्किन केअर प्रोडक्टस, अन्नपदार्थ, पाणी, वातावरण प्रत्येक ठिकाणी मेटल टॉक्सिसिटी उपलब्ध असतात. ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते.

असंतुलित आहाराचे सेवन

तुमच्या आहारात सर्व प्रकारचे पोषक तत्व नसतात तेव्हा शरीर अशक्त होऊ लागते. असंतुलित आहार घेतल्याने रोगप्रतिकारक शक्तीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. प्रोटीन आणि व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे बहुतेक लोक त्रस्त आहेत. हे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करण्यासाठी जबाबदार आहेत.

मिठाईचे जास्त सेवन

साखरेमुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो. खूप गोड पदार्थांचे सेवन केल्याने एजिंगची समस्या तर होतेच पण रोगप्रतिकारक शक्ती गंभीरपणे कमकुवत होऊ शकते.

दिवसातून फक्त एक ते तीन चमचे साखर खाणे ठीक आहे. परंतु त्यापेक्षा जास्त हानिकारक आहे.

व्यायामाने येणारा थकवा दूर करण्यासाठी कामी येतील हे 'सुपरफूड्स'...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा